Aagari Ghei Bharari

‘आगरी घेई भरारी’ आगरी समाजाच्या विविध पैलूंना जगासमोर आण्णारा पहिला युट्यूब चॅनेल आहे. ‘आगरी घेई भरारी’ या वेबसिरीजच्या माध्यमातून आम्ही येत आहोत. समाजातील असामान्य व्यक्तिमत्व, मेहनत, कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज मान प्रतिष्ठा आणि नावलौकीकता मिळवलेली आहे अश्या रत्नांना तुमच्यासमोर घेऊन येतोय. त्यांच्या यशाची यशोगाधा त्यांच्याच मुखातून तुम्ही अनुभवु शकता आणि येणा-या तरुण पुढीला नक्कीच यातुन मार्ग सापडेल दिशा मिळेल. स्वःताला सिध्द करण्यासाठी या रत्नांच्या सारखे नविन अनेक रत्न भविष्यात आगरी समाजात तयार होतील यासाठी ‘आगरी घेई भरारी’च्या माध्यमातून हा शिवधनुष्य उचलला आहे.