Dnyanaa_khillare

नासिवंत सुखासाटी / अंतरला जगजेठी //१//
नाहि नाहि याते गोडी / लक्ष चौऱ्याशीची जोडी //२//
मनुष जन्म गेल्या वारे / काय करशील बारे //३//
शिवराजे सांगे जना / म्या तो सोडीली वासना //४//
- छत्रपती शिवाजी महाराज
("छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः रचलेला एक अभंग,ज्याची प्रथमची उपलब्धी आपणांसमोर.")

संकलन- ह.भ.प.युवाश्री ज्ञानेश्वर महाराज डोणगांवकर मो.9423434848