DevMajha. com

नमस्कार,
मी धर्मनाथ फातरपेकर, संपादक devmajha.com

DevMajha हा माझा आध्यात्मिक प्रवास आहे ज्यात अनेक मोठी लोक प्रश्नांची उत्तरे आणि जटिल कन्सेप्ट समजून सांगतात.

माझा मराठी वाचण्याचा थेट संबंध 2 वर्षा पुर्वी सुरू झाला. आयुष्य बिझनेस सांभाळण्यात गेले अध्यात्माचा कोणताच संबंध नवता. गोडी निर्माण झाली त्यातून हा उपक्रम आणि स्वामी सेवा.

चॅनल लोगो मध्ये स्वामी पण खूप content समर्थ रामदास स्वामींचे कारण यांत्रिकी पणे पोथी वाचायची त्यापेक्षा पोथी का वाचायची हा मार्ग समर्थंकडून भेटतो ही माझी समजूत आहे.

चॅनल वर भक्तांचे अनुभव घेत नाही त्याचे काही कारण आहेत.
* रंजक कहाणी पेक्षा त्यातून आपण काय बोध घ्यावा हे कोणी सांगत नाही.
* मला कोणाचा अनुभव / तत्त्वाची अनुभुती ऐकण्यापेक्षा मला ती तशीच अनुभुती कशी मिळेल ह्यावर भर आहे.
* भक्त अनुभव सांगताना एक संकुचित प्रसंग सांगतात. त्या मागची गुरू कृपा सांगत नाही.
* अनेकांचे सांगणे की अनुभव चॅनल वर टाकले की लोकांची श्रद्धा वाढते. मी कोण काय वाढवणारा...

चॅनल आता 2 वर्षाचा झाला. मी काय शिकला तर अध्यात्म सोपे आहे. आपण ते complicated करून ठेवतो.