MALHAR TV

"मल्हार टीव्ही" स्थानिक जनतेच्या समस्यांवर कटाक्ष

मल्हार टिव्ही’चे पूर्वीचे नाव होते ‘चॅनेल वन’. या चॅनेलची सुरुवात २ जुलै २००६ रोजी झाली. या चॅनेलचा शुभारंभ प्रख्यात अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. २०१३ साली चॅनेलचे हे नाव बदलून ‘मल्हार टिव्ही’ करण्यात आले. ‘नवी दिशा, नवा ध्यास’ घेऊन मल्हार टीव्हीने १४ वर्षे पूर्ण केली आहेत.
रायगड जिल्ह्यातील नामांकित चॅनेल म्हणून ‘मल्हार टिव्ही’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला, क्रीडा, आरोग्य यांसारख्या सर्वच क्षेत्रांत समाजाचा आरसा म्हणून आम्ही योगदान देत आलो आहोत. आमचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीनुसार सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ‘मल्हार टिव्ही’ ची आजवर वाटचाल राहिली आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. काळानुसार बदलावे लागत असले तरी वाचकांशी जुळलेली नाळ कायम राहील. आमच्या या प्रयत्नांना आपण निश्चित प्रतिसाद द्याल आणि आपल्या प्रतिक्रियाही कळवाल, ही नम्र अपेक्षा..