सार - असार विचार स्रोत

मानवी जीवनाचे मूल्य मापन त्याच्या विचार व आचारावर अवलंबून असते.
:स्व परिचय:
माझे नाव विठ्ठल रामचंद्र यादव. देगाव, पुणे.   जेष्ठ गायक स्वर्गीय रामचंद्र बुवा यादव माझे वडील. तसेच डॉक्टर रवींद्र गांगुर्डे यांचे कडून सुद्धा मला शास्त्रीय गायन शिकण्याची संधी मिळाली.
नामवंत  गायक खाशाबा,  तुळशीराम बुवा दीक्षित,  मारुती बुवा  बागडे, नारायण बुवा दीक्षित अशा अनेकांच्या बरोबर माझ्या वडिलांनी  भजनाच्या अनेक मैफिली  महाराष्ट्रात   केल्या.  पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्यासारखे अनेक शिष्य तयार केले. सुरेश वाडकर यांच्या घरी चार वर्षे राहून संगीत भजनाचे मार्गदर्शन केले. पुण्यातील सुप्रसिद्ध पखवाद वादक अण्णा भूमकर, पांडुरंग दातार , जंगले माऊली अशा  नामवंत वादकांनी वडिलांना भजनात साथ केली हे ऐकून फार आनंद होतो. मी २००० साली पाहिले बीजेचे कीर्तन केले. अद्याप पर्यंत सेवा चालू आहे.
वडिलांच्या  व इतर गुणीजनांच्या भजनातील गोड चाली  लोप पावू नये म्हणून मी हे चॅनेल चालू केले आहे. चॅनल सबस्क्राईब करावे व भजनांचा आनंद घ्यावा ही विनंती. राम कृष्ण हरी.
विठ्ठल यादव, पुणे.