SANT KRUPA

संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥
मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥
कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप ॥२॥
तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥३॥

जय हरी माऊली,
या चॅनलच्या माध्यमातुन आपणापर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचे कार्य करायचा निस्वार्थी भाव आहे. आपण ही भागवत धर्माची पताका हाती धरुन हे व्हीडिओज इतर सज्जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे ईतकीच माफक अपेक्षा आहे.

धन्यवाद 🙏
* सूचना :- आमचे कुठलेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये.