Ashok Shirsath (Master of Lezim - लेझीम)

Ashok Shirsath (9821473344)
लेझीम हे महाराष्ट्रातील एक लोकनृत्य आहे.
माझा जन्म एका गंगादेवी नावाच्या गावात झाल्यामुळे लहानपणापासूनच जत्रेत किंवा इतर सोहळ्यात मनोरंजन म्हणून गावातील जेष्ठ लोकांना लेझीम खेळताना पाहिले आहे. हा लेझीमचा लुप्त होणारा खेळाचा वारसा कुठेतरी पुढे चालवावा म्हणून शहरात अनेक शाळेत मी विद्यार्थ्यांच्या हातात लेझीम देऊन त्यांना लेझीम शिकवत घडवण्याचे कार्य करत आहे. आजवर आम्ही अनेक जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली आहेत.
लेझीम नृत्य हलगी, ढोल, झांजा, ताशा या वाद्यांच्या किंवा आधुनिक काळात बॅंडच्या साथीवर केले जाते. सर्व नर्तकांच्या हालचाली तालबद्ध व एकसमयावच्छेदेकरून होत असल्याने त्यात आकर्षकता निर्माण होते. ग्रामीण देवदेवतांच्या पालख्या, गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सार्वजनिक मिरवणुका, खेड्यातल्या जत्रा, उरूस यांच्यापुढे लेझीम खेळणारे ताफे पाहावयास मिळतात. एक व्यायामप्रकार म्हणून शालेय शारीरिक शिक्षणात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.