Shrikant Dhalkar

अनेकजणांना अनेक गोष्टी सुंदर येत असतात. पण या सुंदर गोष्टी समोरच्याच्या मनात आनंद ,समाधान किंवा नवीन विषयाची सर्जनशीलता निर्माण करू शकतात, यासाठीच माझा नेहमी प्रयत्न असतो.
             अनेक योग संस्था, विद्यालये यातून जे आसन, प्राणायाम तसेच अन्य विषयही चित्र मूर्ती, कीर्तन काव्य, निरिक्षण पद्धत, कथा कथन, वक्तृत्व ईत्यादी  शिकविले जाते ते त्यांच्या त्यांच्या ठाई खरेच उत्तम असतेच फक्त आपल्याला खरी गरज आहे ती एकमेकांत तुलना 'न' करता प्रत्येकाच्या व्यासपीठावर त्या त्या पद्धतीने शिकविणे व ग्रहण करणे, मात्र प्रत्यक्षानुभव घेणे व त्याचा सराव करता करता स्वतःची प्रगती करणे हे आपल्याच हातात आहे.  आणि स्वानुभवातून अजून सोप करून जे तुम्ही  दुसर्‍या साधका समोर ठेवता तेव्हा तोही तूमच्या अनुभवाच्या जवळ जात आहे असे त्याला वाटत असल्याचे तूम्हाला सांगितले पाहिजे.
               यासाठी आपण प्रत्येकाने प्रत्येक घटकाकडे पहाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व कौशल्यात्मक बनविला  पाहिजे.