Path-Purava

🙏 नमस्कार, मी सुमित कुळे

🕵️‍♂️ “पाठपुरावा – Path-Purava” ही संकल्पना मी सुरू केली आहे.
या चॅनलचा उद्देश 👇
🔹 सामान्य नागरिकांना दररोजच्या वापरातील प्रशासकीय कायदे समजावून देणे
🌾 शेती व शेतकऱ्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन व माहिती उपलब्ध करून देणे
⚖️ हक्क आणि न्यायासाठी जागृती निर्माण करणे

👉 पाठपुरावा ही संकल्पना माझ्या स्वतःच्या अन्यायकारक अनुभवातून जन्माला आली.
या अस्थिर समाजात सामान्यांची कशी पिळवणूक व शोषण होते हे मी जवळून अनुभवलं.
त्या अनुभवातून मी आवाज उठवायला शिकलो आणि अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देण्याची तयारी केली.

💪 माझ्या सोबत असंख्य भाऊ-बंदू आहेत, विशेषतः माझा शेतकरी राजा –
जो आज सर्वात जास्त त्रास सहन करतोय.
म्हणूनच आता सोडायचं नाही – तोडायचं पण नियमानुसार, कायद्याच्या मार्गानेच!

📜 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घटनात्मक अधिकार
प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्यांची अंमलबजावणी करणे
हा पाठपुरावा चॅनलचा खरा हेतू आहे.

✨ चला, एकत्र येऊ –
✅ हक्कासाठी लढू
✅ न्यायासाठी उभं राहू
✅ कायद्याचा पाठपुरावा करू!

🚩 Subscribe करा | Share करा | Awareness पसरवा 🚩