Kaajwaa

मंडळी मला सांगा.. समजा तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुम्हाला एखादी कथा वाचायला दिली पण तुम्हाला ती वाचायला कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला वाचायला आवडत नसेल.. पण समजा तीच कथा त्याच भावनेने तुम्हाला कोणी वाचून दाखवली तर? किती बरं होईल नाही?

जशी आपली आजी लहानपणी आपल्याला छान छान गोष्टी सांगायची आणि मग आपण त्या गोष्टींमध्ये किंवा कथेमध्ये अगदी हरवून जायचो..

तर मंडळी, अशाच छान छान, नवनवीन आणि वेगळ्या धाटणीच्या कथा आम्ही काजवाद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.. जिथे तुम्ही कथा फक्त ऐकणार नसून तर त्या अनुभवणार देखील आहात..