Swami Makarandnath, Pune

सद्गुरू पू स्वामी मकरंदनाथ हे आदिनाथ श्रीशंकरांपासून ज्ञानेश्वरमहाराज आणि पुढे पावसचे स्वामी स्वरूपानंद व पुणे येथील पू स्वामी माधवनाथांपर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाचे सांप्रत अध्वर्यू आहेत.
पुणेस्थित स्वामी मकरंदनाथ हे राजयोगप्रणीत सोSहम् ध्यानसाधनेचे अंतरंग मार्गदर्शक असून सोSहं ध्यानाचे अनुग्रह देतात.ते 1996 सालापासून नियमितपणे पारमार्थिक विचारांचे प्रबोधन भगवद्गीता,ज्ञानेश्वरी,दासबोध ह्या ग्रंथांच्या आधारे पुण्यामध्ये ध्यानमंदिरात तसेच ग्रंथ लेखनाच्या आधारे करतात.पुण्याजवळ भूगावजवळील साधकाश्रमात स्वामीजी साधना शिबिरे घेतात.सुशिक्षित,तरुणवर्गामध्ये ध्याननामादि साधना शिकवून समाज घडविण्याचे कार्य ते अव्याहतपणे करीत आहेत.प्रपंच व परमार्थ एकरूप करून धन्यतेचे जीवन जगता येते हा आदर्श वस्तुपाठ स्वतः आचरून ते समाजाला देत आहेत.
स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ ह्या संस्थांच्या माध्यमातून स्वामीजी परमार्थाचा प्रचार-प्रसाराचे कार्य पुणे तसेच देश,परदेशात करीत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:

मंदार वझे - 9545388686
केदार वझे - 9730578029