Pune Live पुणे लाईव्ह

पुणे लाईव्ह | निर्भीड निष्पक्ष व निशुल्क पत्रकारितेचं नवं अवकाश 'पुणे लाईव्ह ' या मराठी माध्यमातून खुलं झालं आहे. हाती लेखणी असो किंवा माईक वा कॅमेरा…माध्यमं बदलली तरी वस्तुनिष्ठ बातमीतलं सत्य बदलत नसतं, 'आपल्या आणि आतल्या बातम्या' आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी आता आपल्या पुणे लाईव्ह या मराठी माध्यमाची जाहिरातीसाठी वा जाहिरातदारांच्या पुढे लोटांगण न घालणारी, नव्या ढंगातील कोऱ्या करकरीत पत्रकारितेची परंपरा सुरू झाली आहे. आता गरज आहे ती आपल्या विश्वासाची... पुण्यासह महाराष्ट्र भरात ‘पुणे लाईव्ह’हे डिजिटल माध्यम निर्भीड, निष्पक्ष, निशुल्क बातम्यांमधून 'टिटवी देखील समुद्र आटविते' या म्हणीचा प्रत्यय आणून देत सच्च्या पत्रकारितेचा वसा चालविणार आहे. 'डोळ्यात केर आणि कानात फुंकर' अशी भंपक पत्रकारिता न करता , प्रत्येक घडामोडी, घटनेचे विविधांगी कंगोरे, त्याचे भविष्यातील परिणाम व घटनेला कारण असलेल्या यंत्रणेचा पर्दाफाश होईल हाच आमचा शब्द 🔴Pune Live 🔴 संपर्क - 7020373091 / 9850917070 | ईमेल- [email protected]