Sangeet Setu

संगीत . . सृष्टीच्या कणाकणात आणि प्रत्येक व्यक्तीच्या मानामनात सामावलेला नादब्रह्म . . आनंदाचे डोही आनंदतरंग उमटण्यासाठी संगीताच्या स्वरतारा छेडायलाच हव्यात . . मानवी व्यक्तिमत्व घडविणारा प्राथमिक स्तर म्हणजे शाळा . . शाळांतील शिक्षण आनंददायी होण्यासाठी 'कला' विषयातील 'संगीत' हा तर गाभाच . . एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांवर संगीतसंस्कार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगोचित गाण्यांची गरज प्रत्येकाला असते. आणि हीच गरज ओळखून माझ्या डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थीनींच्या प्रेरणेतून मी आघरकर मीरा (रिटायर्ड संगीत शिक्षिका) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खास आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे माझा यु ट्युब चॅनेल 'संगीत-सेतू' . . या चॅनेलच्या माध्यमातून माझ्या जवळील गाण्यांचा अनमोल खजिना तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावा हाच एकमेव उदात्त हेतू आहे . .

" संगीत सुरांचा साज
संगीत शब्दमय मोती . .
अनमोल खजिना घेऊन आला
'संगीत-सेतू' तुमच्यासाठी"