Shivam Pratishthan Gharewadi

आदरणीय श्री. इंद्रजित देशमुख (काकाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी १२ जानेवारी २००० साली घारेवाडी, ता. कराड. जि. सातारा येथील निसर्गरम्य परिसरात प्रतिष्ठानची स्थापना करून सामाजिक कार्याची सुरवात केली. त्या अंतर्गत वर्षभर विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. प्रामुख्याने युवा हृद्य संमेलन, बाल संस्कार शिबीर, गुरुजन हृद्य संमेलन, शौर्यवर्धिनी सखी हृद्य संमेलन, शेतकरी हृद्य संमेलन, मायभू यात्रा इत्यादी त्याचबरोबर सावली वृद्धाश्रम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व निवासी अभ्यासवर्ग या उपक्रमांचाही यात समावेश आहे.
मंगल हो.