वझुर ग्राम दर्शन

वझुर - ऐतिहासिक पुरातन वारसा लाभलेले गाव असून येथे सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, प्रवासाच्या पाऊलखुणा आहेत.
हे गावं एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ असुन याठिकाणी असलेले प्राचीन मंदिरे, शिलालेख, सुंदरमूर्ती, अवशेष,भूमिगत बारव,विरंगना शिल्प, विरगळ, सतीशीला, प्राचीन कुंड, प्राचीन दुरडी विहरा, विविध मंदिरे श्री स्वार्मीचा मठ (दत्तपरंपरा),धर्मशाळा,भवानी आईचे मंदिर,बालाजी मंदिर,गुगळेश्वर मंदिर,राम मंदिर,खंडोबा देवस्थान,जैन मंदिर,संतांची समाधी स्थळ,जुने वाडे, अंतर्गत भुयारी मार्ग,टोपच्या लादण्या,गोदावरी नदी,वनभोजन,बोटिंग,निजामकालीन जहांगीर यांचे कार्यालय वाडे, लादण्या, भुयारीमार्ग, नदी संगमाचे ठिकाण (खडकी व गोदावरी),ट्री हाऊस,धर्मशाळा, गोंधळ कला, हस्तकला (पेबल आर्ट),डहाक कला,वारकरी संप्रदाय, संगीत भजन, नाट्यकला,ज्योतिष्यशास्त्र व आयुर्वेदिक चिकित्सालय,प्राचीन ,वझुर गावचे प्रवेशद्वार,नगारखाना,व बरेच काही आहे. वझुरच्या प्राचीन सांस्कृतिक वैभवशाली संपन्नतेचा, निसर्गसौंदर्याचा आनंद येथे घेता येतो!

संपर्क
प्रल्हाद पवार, सदस्य, परभणी जिल्हा ऐतिहासिक प्राचीन अभ्यास गट,
9766041990