Kathayan09 / कथायण09

बोली टिकली तर भाषा टिकेल.
आजची मराठीची वाटचाल पाहून मराठीच्या गतवैभवाला ओहोटी लागलीय की काय? असा प्रश्न निर्माण होतो. मराठी भाषेत कितीतरी परकीय शब्दांची घुसखोरी वाढली आहे. हा धोका ओळखून प्रचंड दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी मराठी भाषेचे शुद्धीकरण करुन पहिला मराठी शब्दकोश निर्माण केला होता.
आज महाराष्ट्रात मराठी आहे ती खेड्यांमुळेच ! असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण शहरातील लोकांना मराठी भाषेपेक्षा हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलणे प्रतिष्ठेचे वाटते. मात्र खेड्यातील माणूस आपल्या मराठीबोलीतून बोलतो. म्हणूनच ग्रामीण बोली टिकली पाहिजे.
यासाठीच खारीची वाटा म्हणून या YOUTUBE चॅनेलच्या माध्यमातून मी स्वतःच्या तसेच इतर प्रतिष्ठित लेखकांच्या बहुतांश ग्रामीण कथांचे "अभिवाचन" करण्याचा प्रयत्न करत आहे.
@Kthayn09 / कथायण09 वरून सादर होणाऱ्या ह्या कथांचे मूळ हक्क लेखक आणि प्रकाशकांकडेच सुरक्षित आहेत.
हे कथावाचन केवळ मराठी साहित्य आणि वाचन संस्कृतीचा प्रसार, प्रचार आणि स्वअध्ययनासाठी केलेले आहे. हे चॅनल ह्या कथांवर कोणताही अधिकार किंवा हक्क सांगत नाही.
धन्यवाद!