Saichha Bhajan Mandal

साईच्छा हा एक प्रवास ज्याची सुरुवात २००७ मध्ये देवाची आरती करण्याच्या उद्देशाने झाली. 
हा उद्देश साकारात कधी त्या आरतीचं भजनात रूपांतर झालं कळलच नाही.....आणि सुरुवात झाली समाजबांधिलकीच्या प्रवासाला हा समाजबांधिलकीचा प्रवास 
पूर्णपणे साकार होऊ लागला साईनामाच्या गजरावर आणि त्याचबरोबर साईनामाची ज्योत महाराष्ट्रभर तेवत ठेवण्याचा वसा साईच्छा ने घेतला. 
गेल्या काही वर्षात कलेला प्रोत्साहन देण्यासाठी साईच्छा कला अकादमीची स्थापना ह्या मंडळाने केली. त्याच बरोबर मानवतेचा अर्थात माणुसकीचा धर्म जपत नवनविन कार्यक्रमाची सुरुवात केली.
"अर्थात साईच्छा हे एक नाव नसून तर आयुष्यभर न संपणारा प्रवास आहे...."


खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हाच एक हेतु घेउन साईच्छा काम करत आहे.
धर्म जाती पंत यांच्या आहारी न जाता फ़क्त माणुसकिचा झेंडा घेउन वारी करणारी ही साईच्छा इतरांच्या आनंदात आपला श्वास शोधणारी ही साईच्छा........