Public Katta

पब्लिक कट्टाच्या माध्यमातुन तुमच्या आमच्या सभोवतीचे युवा उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, प्रथितयश व्यावसायिक, सिध्दहस्त लेखक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे निष्णात डॉक्टर, कायद्याच्या गर्भात दडलेली विविध कलमे व उपकलमे यांचा समाजोपयोगी अर्थ लावून पिडीत व्यक्तीला न्याय व गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यात पुढाकार घेणारे कायदेतज्ञ, वकील, गल्ली ते दिल्ली गाजवणारे युवा राजकारणी, त्यांची स्वप्ने, त्यांच्या मतदारसंघा बाबतीतील त्यांचे व्हिजन, समाजात वेगवेगळ्या पातळीवर चांगले काम करणा-या अवलियांची माहिती, त्यांच्या मुलाखती याबरोबरच लोककला, संस्कृती, पारंपारिक सण, सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध विषय हाताळले जाणार आहेत. त्याच बरोबर पब्लिक कट्ट्यावर नेत्यांच्या संघर्षगाथा, नेत्यांचे डावपेच, त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेली कामे, सर्वसामान्यांच्या यशोगाथाही हाताळल्या जाणार आहेत. एकंदरीत समाजातील सर्व थरातील प्रेक्षक व वाचकांच्या आवडीचे सर्व विषय पब्लिक कट्ट्यावर येणार आहेत !