Buddhashasan TV

बुद्धशासन टीव्ही बाबत थोडक्यात माहिती

"जनसामान्यांचा स्वाभिमानी आवाज, बुद्धशासन टीव्ही, महाराष्ट्रातील एकमेव कर्तव्यदक्ष आंबेडकरवादी चॅनेल"
नमो बुद्धाय, जय भीम! बुद्धशासन टीव्ही बौद्ध तसेच आंबेडकरी ऐतिहासिक स्थळांवरून ऐतिहासिक दिनी मुख्यतः लाईव्ह टेलिकास्टिंग करते, असे लाईव्ह करणारे बुद्धशासन टीव्ही पहिले व एकमेव चॅनेल आहे. यासोबतच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात, लोकजागृती, व प्रबोधन करण्याचे काम करीत असते. याखेरीज आपल्या गौरवशाली व वैभवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी देशातील व राज्यातील प्राचीन लेणी, स्तूप, विहार इत्यादी बौद्ध स्थळांना नियमित भेटी देवून ती माहिती आपल्या पर्यंत बुद्धशासन टीव्ही पोहचवण्याचे काम करीत असते.
बुद्धशासन टीव्ही मुख्यतः सोशल मीडियावर कामकरीत असून, बुद्धशासन टीव्हीचे युट्यूब चॅनेल, टेलिग्राम चॅनेल, फेसबुक पेज व वेब पोर्टल आहे.
बुद्धशासन टीव्हीची महत्त्वपूर्ण कार्यसूची
◆ १. धार्मिक
◆ २. सामाजिक
◆ ३. शैक्षणिक
◆ ४. राजकीय
◆ ५. आर्थिक
◆ ६. व्यवसायिक