Shaala शाळा

१० वी , १२ वी झाल्यानंतर विद्यार्थ्या समोर मोठा प्रश्न असतो तो म्हणजे करिअर निवडण्याचा. 'करिअर' म्हणजे विद्यार्थ्याला काय हवं असतं? एक म्हणजे आपण निवडलेल्या क्षेत्रात दिर्घकाळ राहून पैसा व नाव कमवायचे आहे, या व्यतिरिक्त करिअरविषयी असे म्हणायचे असते की, मी निवडलेल्या क्षेत्राचा मला नीट अभ्यास करायचा आहे. खूप कामाचा अनुभव घ्यायचा आहे. या क्षेत्रात काम केल्याने मला समाधान मिळेल. थोडक्यात काय, तर आपल्या मनातील वरिल सर्व गोष्टीचा सर्व समावेशक अर्थ म्हणजे करिअर असे म्हणण्यास हरकत नाही. विद्यार्थी दशेत करिअरविषयी निर्णय घेण्याचा टप्पा साधारणपणे इयत्ता दहावी पासून सुरु होतो. या टप्प्यात योग्य निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी ठरलात की, तुमची करिअरच्या दिशेने योग्य वाटचाल सुरु होते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न 'शाळा' या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला आहे. ते सर्व विद्यार्थ्यांच्या नक्कीच कामी येईल ही आशा बाळगतो. तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो करिअर विषयक काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा.