Yewale Academy

उद्देश : सक्षम भारत, आदर्श भारत
नमस्कार मित्रांनो माझे नाव चंचल सतीश येवले आहे. मी इंग्लिश भाषेची ट्रेनर असून, आम्ही हजारो विद्यार्थ्यांना क्लासेसच्या तसेच ऑनलाईन [झूम] पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकवीत आहोत. आणि आज आमच्या २१ व्या शतकात स्पर्धेत टिकून राहायचे असेलतर, इंग्लिशशिवाय पर्याय नाही.
आज इंग्लिश ही जागतिक भाषा असल्यामूळे, तुम्हाला सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब,किंवा व्यवसाय सुरु करायचा असेलतर, तुम्हाला इंग्लीशशिवाय पर्याय नाही. त्याच बरोबर कुणाची इंग्लिश शिकण्याची इच्छा असेलतर, त्यांच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.
आम्ही इंग्लिश स्पिकिंगची पूर्ण सिरीज घेऊन येत आहोत. त्या माध्यमातून तुम्हाला घराच्या घरी इंग्लिश शिकता येईल. सोबतच वेगवेगळ्या विषयाला अनुसरून आवश्यकतेनुसार ऑनलाईन माध्यमातून तुमच्या भेटीला देखील आम्ही आहोत.
तुम्हाला मिळालेल्या या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही शैक्षणिक, बौद्धिक, व्यावहारिक, आणि आर्थिकदृष्ट्या, सक्षम व्हाल, तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत सक्षम होईल, आणि आमचा हा चॅनेल सुरु करण्याचा उद्देश सफल होईल.