क कायद्याचा

नमस्कार
क कायद्याचा हा चॅनेल का सुरु केला ?

प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे वैद्यक शाखेतील प्रसिद्ध तत्व कायदा क्षेत्रात देखिल लागू होते. वकिली सुरु केल्यापासून मी अशी अनेक प्रकरणे हाताळली आणि बघितली आहेत जी थोड्याशा काळजीने टाळता आली असती. असे म्हणतात की मोठेमोठे पेच केव्हाच सोडवता आले असते, जेव्हा ते लहान होते. कायदेशीर पेचांचे देखिल असेच आहे.

कायदेशीर पेच निर्माणच होवू नयेत आणि झाले तर त्यातुन लवकरात लवकर बाहेर पडता येण्याकरता कायदा साक्षरतेची नितांत आवश्यकता आहे. मात्र असे असूनही कायदा साक्षरता क्षेत्रात विशेष भरीव काम होतांना दिसत नाही. सर्वसामान्य लोकांना साध्या सोप्या भाषेत कायद्याची माहिती देवून कायदा साक्षरता निर्माण करण्याकरता या चॅनेलेची सुरुवात करण्यात आलेली आहे.