Nisargmitra

"निसर्गप्रवास" ...! हे आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण असतात, ज्यांमध्ये आपण एक वेगळ्या दुनियेची नवीन ओळख प्राप्त करतो.
आपल्या भारतात एकूण 29 राज्ये नाहीत तर वेगवेगळे व वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक, सांस्कृतिक, नैसर्गिक रचना असलेले वेगवेगळ्या भाषा, वर्ण, रीतिरिवाज, जीवनपद्धती तसेच आपला स्वतःचा एक वेगळा इतिहास असलेले तसेच वेगवेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीने सजलेले जणू 29 देशच आहेत..
त्यातही आपला महाराष्ट्र तर अजूनच वैशिष्ट्यपूर्ण व अनोखा आहे. आणि यात भर घातली आहे ती येथील अतिशय अनोख्या नैसर्गिक व भौगोलिक रचनेने समृद्ध असलेल्या अनेक अजोड स्थळांनी, येथील समृद्ध सगरकिनाऱ्यानी, उत्तुंग व बेलाग पर्वतांनी, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अनेक मंदिरे व राजवाडे, महालांनी तसेच आपल्या दैदीप्यमान इतिहासाने व हा इतिहास घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या किल्ला संस्कृतीने...
आपल्या संपूर्ण भारत देशात जेवढे किल्ले आहेत त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे जवळ-जवळ 400 किल्ले हे एकट्या महाराष्ट्रात आहेत व त्यातही सर्वात जास्त (जवळपास 325) हे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आहेत.