VastuRahasya वास्तु रहस्य

जय गणेश,
मी, बबनराव पाटील, वास्तुमार्गदर्शक आणि पुरातत्व अभ्यासक, गेली सोळा वर्षे सातत्याने वास्तुविषयक मार्गदर्शन त्याप्रमाणे वास्तुविषयक लिखाण करीत आहे. माझे "वास्तुरहस्य" नावाचे दिवाळी मॅगझीन गेली दहा वर्षे प्रकाशित होत होते. त्यास अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्याचप्रमाणे "वास्तुमंथन" नावाचे केवळ वास्तुशास्त्राला समर्पित असे पुस्तक प्रकाशित झाले असून ते वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. याशिवाय "सामना" या वृत्तपत्राच्या "उत्सव" पुरवणीमध्ये दोन वर्षे शंभर लेखांचे लिखाणही केले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. माझी "५५५ तोडगे -पैशासाठी, सुखासाठी "भाग १" आणि "भाग २" ही पुस्तके विक्रमी विक्रीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. वास्तुविषयक प्रशिक्षण वर्ग पुणे येथे घेतले जातात. याशिवाय .पुरातत्व अभ्यासक असल्याकारणाने प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास विविध अंगांनी करता येतो .माझ्या अध्यापनामध्ये सुद्धा याचा विद्यार्थ्यांना फारच लाभ होतो. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण वर्गामध्ये नोट्स देखील पुरवल्या जातात.