भव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव, बीड (स्व झुंबरलालजी खटोड सामाजिक)

बीडमध्ये कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी

बीड शहरातील अध्यात्मिक आणि सांस्कृतिक चळवळीचे वैभव ठरलेल्या स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या 15 व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे बीडमध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. मसरतनगर येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले अध्यात्मनगरीत कीर्तन सभा मंडपाची उभारणी सध्या सुरू आहे. येत्या 31 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव संपन्न होणार आहे. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांच्यासह नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा बीडमध्ये होणार आहे.

मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असतांना भारतीय संस्कृती आणि निती मुल्यांची जोपासणा कायम होत राहील या हेतूने घेण्यात येणारा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव बीडकरांच्या प्रतिसादामुळे सर्वदूर पोहोचला आहे. सामुदायिक विवाह सोहळा, मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी 501 कन्यारत्नांचा नामकरण सोहळा यासह महिला अत्याचार विरोधी प्रबोधन महारॅली हे यंदाच्या कीर्तन महोत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे,