संजय महाराज मोरे Sanjay More Official

श्री ह.भ.प. संजय महाराज मोरे लातूरकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. लहान वयातच त्यांना भजनाची आवड लागली. त्यांचे वडिल ह.भ.प. गजानान महाराज मोरे हे कीर्तन भजनामध्ये पखावज वादन व भजन गायन करत. त्यातूनच महाराजांना यांत रस उत्पन्न झाला. त्यांची इच्छा होती की संजय महाराज गायक व्हावे. त्यांनी इयत्ता आठवी पासून संजय महाराजांना श्री गोपीनाथ गुरुजी भाडगावकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे घेण्यासाठी पाठवले. तेथे महाराजांनी गायन, तबला, पखावज, हार्मोनीयम, गीता पाठ, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज गाथा, संस्कृत व्याकरण इत्यादी विषयांचे प्राथमिक ज्ञान मिळविले. पुढील संगीताचे शिक्षण त्यांनी श्री विठ्ठलराव जगताप सर, श्री संतोष थोरात सर, श्री हरिष कुलकर्णी यांच्याकडे लातूर येथे घेतले. नंतर ते पद्वीत्तर शिक्षण घेण्यासाठी ते पुणे विद्यापीठ पुणे येथील ललित कला केंद्रात प्रवेश घेऊन गुरू पं.प्रमोद मराठे व श्री राम हसबनीस यांच्याकडे हार्मोनियम तर श्री मुकुल कुलकर्णी यांच्याकडे गायनाची तालीम झाली. सद्या ते पोदार आंतरराष्ट्रीय शाळा दौंड येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
राम कृष्ण हरि🤩🥰🙏🙏🙏