Abhang rasgrahan

sant tukaram gatha
रोजचे दहा मिनिटे रोजचे दहा अभंग
तुकाराम गाथा भावार्थासह या संकल्पनेतून
एकाच वेळी दृश्य व श्रवण माध्यमातून अभंगांचे वाचन भावार्थासह अभंगाचे आकलन होताना सोपे जाते व अभंगा मागील संतांचे भूमिका व त्यांचे विचार लक्षात येतात.
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची गाथा प्रस्तुत करताना अभंग व त्याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे भाविकांनी सेवे चा लाभ घ्यावा काही उणीव असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये सांगावी
संत तुकाराम महाराज यांचे अभंग अधायात्मिक ऊर्जा तर देतात शिवाय जीवना मध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे शिकवते. भक्ती भाव निर्माण करून जसा त्यांनी ममत्व आणि माणुसकीच्या झऱ्यातील शीतल जल पाजले तशीच भोंदू आणि दांभिकपणा वर सडकून टीका सुद्धा केली.
गाथेचे पारायणे करताना केवळ अभंग वाचन होते पण त्याचा भावार्थ काही लक्षात येत नाही अभंग चा अर्थ कळला तर अभंग आत्मसात होतो व त्या मागील संतांची भावना व विचार स्पष्ट होतात
सदर चॅनल चा उद्देश हा फक्त अध्यात्मिक ज्ञानाची माहिती देणे असून कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हे नाही.
जय जय राम कृष्ण हरी