Akhil Mandai Mandal

श्री शारदा गजानन मंदिर , अखिल मंडई मंडळ , महात्मा फुले मंडई , पुणे - ४११ ००२.
SHRI SHARDA GAJANAN MANDIR , Akhil Mandai Mandal , Mahatma Phule Mandai , Pune 411 002.

इतिहास अखिल मंडई मंडळ आणि शारदा गणेशाचा

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने स्वराज्य निर्मितीची चळवळ ही उत्सव माध्यमातुन लोक जागृती व एकजुट करण्याची विचारधारणा लक्षात घेऊन मंडईतील काही कार्यकर्त्यांनी सन १८९४ मध्ये मंडई मंडळाची स्थापना केली. त्यापूर्वी मंडईमध्ये 'छत्रपती शिवाजी संघ' नावाची संस्था उभारण्यात आली होती. लोकमान्यांच्या प्रभावाने देशभक्तीची जी लाट उसळली त्याचा प्रभाव या संस्थेवरही पडला आणि मिनर्व्हा टॉकिजच्या जवळच गणेशाचा पहिला उत्सव साजरा केला गेला. थोड्याच दिवसात छत्रपती शिवाजी संघाचे रूपांतर 'अखिल मंडई मंडळात' झाले आणि उत्सवाचे स्थलांतर मंडई गाडीतळावर झाले, जे आजतागायत तेथेच आहे.
मंडईच्या शारदा गजाननाची मूर्ती अद्वितीय अशी आहे. उत्सवातील सजावट ही मंडळाच्या बाबतीत गौण असून दर तीन वर्षांनी मूर्ती झोपाळ्यावर स्थापित करण्याची प्रथा आहे.