ई-प्रशिक्षण.कॉम

कर्मचारी हितार्थ, सेवानिवृत्तांच्या सन्मानार्थ एकमेव व्यासपीठ : "ई-प्रशिक्षण.कॉम" सुरवातीला “Dept, Enquiry Solution” या चॅनलच्या माध्यमातून "विभागीय चौकशी आणि निलंबन" बाबत अभ्यास साहित्य अधिकारी-कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचवले परंतु अनेक अधिकारी कर्मचारी यांनी चौकशी आणि निलंबन यापुरते मर्यादित न राहता, अन्य सेवाविषयक विषयांवरही माहिती देण्याची विनंती केली. सदस्यांच्या मागणीचा मान ठेवत, या चॅनलला आता एक मोठे आणि व्यापक स्वरूप देण्यात येत आहे. दि. ०१/११/२०२५ पासून, "ई-प्रशिक्षण.कॉम" या नव्या नावाने आणि संकल्पनेने आपल्या भेटीस येत आहे ! "ई-प्रशिक्षण.कॉम" शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचा एक अभिनव उपक्रम आहे. या डिजिटल माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या महत्त्वाच्या सेवाविषयक बाबींवर, सोप्या आणि साध्या भाषेत तज्ञ अधिकारी/कर्मचारी यांच्या मदतीने प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. Digital Training Any time Anywhere

संकल्पना : विष्णुकांत बोरसे, मार्गदर्शक श्री. कवचाळे साहेब Retd.Jt. Director, प्रेरणास्रोत - मा. श्रीधर जोशी सर सेवानिवृत्त भा.प्र.से.