मनापासून थोडे काही

मित्रांनो, मी, शशिकांत कुलकर्णी, सध्या प्रकाशित करतोय भगवत गीतेतील प्रत्येक श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित, साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये निरूपण - तुमच्या आमच्यासारख्यांसाठी - एका भक्तिमय आणि प्रेरणादायक चॅनलमधून - "मनापासून थोडे काही - “A Dialogue With Our Mind” - आपल्या संस्कृतीचा अभिमान" - जिथे वारसा आणि अभिमान आहे आपल्या संस्कृतीचा, संत वाङ्मयाचा, पारंपरिक स्तोत्रांचा, त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा, आणि त्याचबरोबर ध्यास आहे - प्रेरणादायक, स्फूर्तिदायक अशी मनोगते मांडण्याचा - ज्यातून आशा आहे कि काही शिकायला मिळेल आणि आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग दिसू लागेल.