RASAIDEVIAGRO🐣🐥

श्री रासाई देवी ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी ही गगनबावड्या सारख्या दुर्गम भागात शेतकऱ्यांनी स्थापन केलेली शेतकरी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीमध्ये 265 सभासद शेतकरी आहेत. ही कंपनी गावरान कोंबड्यांपासून देशी अंडी उत्पादन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

श्री रासाई देवी ऍग्रो प्रोडूसर कंपनीला महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट प्रकल्प मंजूर झाला असून यामध्ये कंपनी सभासद शेतकऱ्यांना 500 चार आठवड्याच्या लसीकरण झालेल्या माद्या देते. यामधून उत्पन्न होणारी अंडी कंपनी विकत घेते व त्या अंड्यांचे ब्रॅण्डिंग तसेच मार्केटिंग मोठ्या शहरात करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यामध्ये जास्तीत जास्त तरुण वर्ग तसेच महिलांचा सहभाग घेऊन अंडी उत्पादन तसेच मांस उत्पादन व्यवसाय करून त्यांना रोजगार मिळेल आणि रोजगार निर्मिती हाच या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.

आम्हाला फॉलो करा:-
Instagram- rasaidevi_agro
Facebook- rasaidevi_agro

आपल्याला पण कोल्हापूर जिल्ह्यात गावरान कुक्कुटपालन व्यवसाय करायचं आहे….?
संपर्क
प्रकाश देसाई- 9405559757
ओंकार देसाई - 8530879585