Police Flash News

गुन्हेगारी जगताचा मागोवा घेणारे एक आदर्श मानदंड असलेले साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज गेली सहा वर्ष वृत्तपत्र सृष्टीत संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात लोकप्रिय आहे. आमच्यावर अनेकांनी प्रेम दाखवले, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो. आमच्या पत्रकारितेचे कौतुक महाराष्ट्र पत्रकार संघाने सतत सहा वेळेस राज्यस्तरावरील पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्याचबरोबर जिल्हा पत्रकार संघाने सलग पाच वर्ष उत्कृष्ट अग्रलेख, उत्कृष्ट दिवाळी अंक, संपादक रत्न, पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित केले. यावरूनच आमचा दर्जा काय आहे, हे वाचकांना समजते. ‘भ्रष्टाचाराला लाथ’, ‘सज्जन प्रवृत्तीला साथ’ अशा भूमिकेतून आम्ही लिखाण केले आहे.तसेच या स्पर्धेच्या युगात वाचकांना देशात घडत असलेल्या घडामोडी तात्काळ जाणून घेण्यासाठी पोलीस फ्लॅश न्यूज नावानेच वेब न्यूज पोर्टल सुरु करत आहोत. आम्ही संगणक युगाच्या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देऊ.समाजामध्ये चालत असलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीची माहिती पोहचविण्याचे काम वेब न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. ते आपणास नक्कीच आवडेल यात आम्हाला शंका नाही.
धन्यवाद !