VSK Paryatan

नमस्कार ! VSK Paryatan या चॅनलवर तुमचे स्वागत आहे.

मी विनायक कुलकर्णी, कोल्हापूरचा रहिवासी असून निवृत्तीनंतरचे आयुष्य समाजकार्य तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणे व त्यांचे जीवन निरोगी व आनंदी कसे राखता येईल यासाठी प्रयत्नशील असतो. कोल्हापूरातील एका ज्येष्ठ नागरिक संघाचा पाच वर्षे अध्यक्ष असताना मी ज्येष्ठ नागरिकांसाठी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर अनेक सहली, उपक्रम आयोजित केले आणि हे सर्व करताना ज्येष्ठ नागरिकांना काही काळापुरते त्यांची सुखदु:खे विसरुन जगण्याचा आनंद उपभोगताना मी पाहिले. याचबरोबर या सहलींमधून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि अडचणीदेखील कळाल्या. याशिवाय नोकरीनिमित्त आणि परदेशात वास्तव्यास असलेल्या मुलांच्या भेटींमुळे मला देशविदेशांत अनेक ठिकाणी पर्यटनाचा आनंद उपभोगता आला.

या सर्व अनुभवांचा वापर करुन महाराष्ट्रातील तसेच बाहेरील इतर ज्येष्ठ नागरिकांना पर्यटनासाठी प्रोत्साहित करुन त्यांचे जीवन कसे आनंदी व सुसह्य करता येईल या हेतूने मी हे चॅनल सुरु केले आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.