Digital Bhramanti

आयुष्य हे खूप सुंदर असतं आणि ते आपल्याला जगायचं असत पण........
आपण आपल्या आयुष्यात इतके गुंतून गेलो की स्वतःला एका चौकटी मध्ये बांधून घेतले आहोत.
मी ही माझ्या आयुष्याचे १० वर्षे अशीच घालवली,
पण आता जेव्हा वयाची ३०शी ओलांडली तेव्हा लक्षात आले की आपले निम्मे आयुष्य संपले आणि निम्मेच शिल्लक राहिले
ह्या राहिलेल्या निम्या आयुष्यात जितके महत्व पैशाला आहे तितकेच महत्व वेळेला सुद्धा आहे
आणि मग ठरवलं की आपण आठवडयातले दोन दिवस का होईना आपल्याला जे आवडते ते करावं, आपण मनसोक्त फिरायचे
आपले नशिब हि तितके भाग्यवान आहे की, आपल्याला इतके सुंदर अश्या जगात आपलं जन्म झाला , नैसर्गिक , विविधता व सांस्कृतिक असलेले देश लाभले.

तर मित्रानो माझ्या ह्या भ्रमंतीच्या प्रवासाने आपल्याला हि प्रेरणा मिळावी आणि आपण ही आपल्याला जे आवडेल ते मनोसक्त निडर होऊन करावे.