मकरसंक्रातीला भोग चढवा अशा खमंग भाजीने । भोगीची भाजी । Bhogichi भाजी । sankrantichi bhaji
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2019-01-10
Просмотров: 351001
How To Make Bhogichi Bhaji | Makarsankrat Special | मकरसंक्रांत विशेष भोगीची भाजी | How To Prepare Bhogichi Bhaji | Easy & Simple Recipe By Gharcha Swaad
Roz Buzz app download link 👉🏽 https://tinyurl.com/RozBuzz
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
साहित्य - १ कप वाल पापडीचे दाणे, १½ कप घेवड्याच्या शेंगा दाण्यासहीत, १ कप ओले तूर दाणे, ३" ७/८ शेवग्याच्या शेंगा, १ कप ओला वाटाणा, १ कप बारीक चिरलेल्या चवळीच्या शेंगा, १ कप ओले शेंगदाणे किंवा उकडलेले, १ कप ओले हरभरा चणे, १ कप गाजर, २ लहान वांगी काप केलेली, १ कप भाजलेले सुके खोबरे, ४ tblsp भाजलेले सफेद पॉलिश तीळ, १½ tblsp साधे सफेद तीळ, २" आले, ४ हिरव्या मिरच्या, ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, मूठभर कोथिंबीर आणि २ tblsp कोथिंबीर बारीक चिरलेली, ½ tblps जीरे, ½ tsp हिंग, ९/१० कडीपत्त्याची पाने, २ कांदे पातळ उभे काप केलेले, २½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, १ tsp घरगुती गरम मसाला, १" गुळाचा खडा, ८ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - सर्व भाज्या धुवून घ्याव्यात. मिक्सरमध्ये भाजलेले सुके खोबरे, भाजलेले सफेद पॉलिश तीळ , ४ हिरव्या मिरच्या, आले आणि मूठभर कोथिंबीर घालून त्यात थोडे पाणी टाकावे आणि बारीक वाटण तयार करून घ्यावे. आता एका पातेल्यात तेल गरम करून त्यात तीळ फोडणीला घालावे. तीळ तडतडले कि त्यात जीरे, हिंग, काडिपत्ते, बारीक चिरलेली मिरची, कांदा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य २ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे. कांदा मऊ झाला कि त्यात हळद आणि घरगुती लाल मसाला आणि गरम मसाला घालून सर्व मसाले फोडणीत चांगले परतून घ्यावे. आता यात तयार केलेले वाटण घालावे आणि चांगले ३/४ मिनिटे परतून घ्यावे. परतून झाल्यावर आपल्या सर्व भाज्या एक एक करून घालाव्यात आणि मसाल्यात चांगल्या एकजीव करून घ्याव्यात. आता यात एक ग्लास साधे पाणी घालावे आणि पुन्हा सर्व भाज्या एकत्र करून एकजीव करून घ्याव्यात. आता वर झाकण ठेवून ८ मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. ८ मिनिटानंतर भाजी परतून घ्यावी आणि यात चवीनुसार मीठ, गूळ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ७ मिनिटे पुन्हावर झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ काढा. ७ मिनिटानंतर भाज्या तपासून घ्या. शिजल्या असतील तर हलकी परतून गॅस बंद करावा किंवा नसेल शिजल्या तर २/३ मिनिटे वाढीव वाफ काढा. गरमागरम भोगीच्या भाजीवर चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेले तीळ घालून गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत वाढावी. धन्यवाद !
#makarsankrantspecialrecipe #bhogichibhaji #MixVegetableSabzi
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: