लोकसभा खासदार माननीय निलेश लंके यांनी सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात अहिल्यानगर जिल्ह्यातील...
Автор: Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Загружено: 2025-12-09
Просмотров: 76
लोकसभा खासदार माननीय निलेश लंके यांनी सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अत्यंत तातडीचे आणि गंभीर प्रश्न मांडले.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू यांसारख्या फळबागायती पिकांसह कांदा, द्राक्षे आणि डाळिंब अशा प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, केंद्र शासनाच्या नाफेड आणि NCCF मार्फत राज्यात खरेदी केलेल्या कांद्याचे सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांचे देयक अद्याप थकीत आहे. या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावल्याने ते अत्यंत कठीण अवस्थेत सापडले असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्री महोदयांना खालील महत्त्वाचे प्रश्न विचारले..
१) या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे का?
2. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून विशेष नुकसानभरपाई पॅकेज मंजूर करण्यात आले आहे का?
3. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केलेल्या पिकांचे थकीत पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत का? आणि जर झाले नसतील, तर ते कधीपर्यंत जमा होतील?
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: