आवाहन गीत🙏
Автор: Naad Bramha नाद ब्रह्म हार्मोनियम
Загружено: 2025-09-01
Просмотров: 167
एकवटलेल्या मराठा भावांनो
मागे नाही फिरायचं|
मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सार्थक करायच||1||
मराठा कुणबी आहे एक
शेती करून पिकवतो पीक |
पिढ्यानं पिढ्या खचलेल्यांचा
जरांगे झालाय देव ||2||
मराठा भाऊ माझा शिस्तीचा
बळी झालाय गरिबीचा
शिक्षण खर्चाने दुजाभावाने
खचून गेलाय पार ||3||
मराठा भावांनो आता हक्कासाठी लढा|| धृ||
साद घालू सरकाराला
सरसकट आरक्षणाला |
नसेल भाषा कळत प्रेमाची
शिकवू त्यांना धडा||4||
मराठा म्हणून भोगतोय सत्ता
नेत्यांनीच लावलीय चेष्टा|
एकदिलाने लढा लढूया
भावी पिढीच्या साठी||5||
हात जोडोनी विनवतो तुम्हां
नका करू हो आत्महत्या|
कुटुंबाचा आधार तुम्ही
थोडासा विचार करा||6||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: