अकोले तालुक्यातील एक अपरिचित शिवमंदिर | केळेश्वर महादेव मंदिर | केळी रुम्हणवाडी | अकोले
Автор: Advay Gadekar
Загружено: 2025-03-08
Просмотров: 3351
अकोले तालुक्यातील एक अपरिचित शिवमंदिर | केळेश्वर महादेव मंदिर | केळी रुम्हणवाडी | अकोले
अकोले येथून ३५ किमी अंतरावर केळी रुम्हनवाडी हे गावं आहे. मुंबई, नाशिकवरून इगतपुरी-घोटी मार्गाने टाकेद जवळचा म्हैसवळण घाट चढूनही केळी रुम्हनवाडीला पोहोचता येते. हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील टाहाकारीचे मंदिरही येथून फक्त ३ किमी अंतरावर आहे. केळेश्वर महादेवाचे मंदिर बाराव्या अथवा तेराव्या शतकात बांधले गेले असावे. काळाच्या ओघात मंदिराच्या बाह्यस्वरूपात काही बदल झाले आहेत. मंदिरावरची मूळची ४ शिखरे पडून गेली आहे. मूळच्या शिखरांच्या जागी नव्याने बांधलेल्या कळसांना व मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे या मंदिराचे प्राचीन वैभव काही प्रमाणात लुप्त झाल्याचा आपल्याला भास होतो. तथापि शिखरापर्यंतचा मंदिराचा मुख्य दगडातील भाग आजही मंदिराच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. समोरूनच आढळा नदी वाहते. नदीपासून सुमारे ३०-४० फूट उंचीवर मंदिर उभे असून नदी पात्रालगत बांधलेला घाट, समोरच पावसाळ्यात फेसाळणारा नयनरम्य धबधबा, झाडे आणि सभोवताली असलेल्या डोंगररांगा यामुळे हा परिसर रमणीय बनला आहे.
Google Map Location
https://maps.app.goo.gl/Ey5xn8ekGYrff...
Instagram profile
/ rohangadekar08
Facebook page
/ rohan.gadekar.37
Blogger
https://www.blogger.com/blog/posts/52...
Ganesh nagarkar's Youtube channel
/ @itihasachyapaulkhuna
#temple #history #culture #historical #mahadev #shiv #shiva #shivmandir #mahadevtemple #mahadevmandir #hemadpanthi #ahmednagar #historicalplaces #rohangadekar #keleshwar
#keleshwarmahadev #keleshwartemple #akole
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: