Balya Dance Kokani | बाल्या डान्स | Dapoli (पावनळ- कोंडवाडी) |
Автор: Journey To Miles
Загружено: 2022-09-09
Просмотров: 12518
कोकणातील गणपती म्हटले आहे की 'बाल्या नृत्य' हे ओघाने येतेच. बाल्या नृत्यालाच 'जाखडी नृत्य' किंवा 'चेऊली नृत्य' असेही म्हणतात. या लोकनृत्याची परंपरा कोकणवासीय जपत आले असून, या नृत्यातील लोकगीतांतून भावनांचा आविष्कार, ताल आणि सूर यांचा मिलाफ, आध्यात्मिक मूल्यांची झालर आणि जीवनवृत्तीचे वास्तवादी चित्रण दिसते.
या जुन्या लोकगीतांच्या जोडीला आता काळानुरुप चित्रपटांतील गाण्यांच्या चालीवर गाणी रचली जाऊ लागली आहेत. बाल्या नृत्याची पथके आजही तग धरून आहेत. या नृत्याच्या 'बाऱ्या' म्हणजे स्पर्धा भरविल्या जातात. पिढ्यान् पिढ्या ही लोककला कोकणवासीय जतन करत आला आहे. आता या नृत्याला राजाश्रयाची गरज आहे. राज्य सरकारने हे लोकनृत्य आणि लोकगीते यांची परंपरा कायम टिकवून ठेवण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. त्यासाठी गणरायाकडे प्रार्थना!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: