Rahuri Band News | राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, कडकडीत बंद
Автор: SP 24 TAAS
Загружено: 2025-03-27
Просмотров: 9246
Rahuri Band News | राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, कडकडीत बंद
Rahuri Band
Chhatrapati Shivaji Maharaj
Rahuri Prajkta Tanpure
Rahuri Crime News
राहुरी शहरात महापुरुषाची विटंबना..
जातीय सलोखा राखणा-या शहरात तणाव..
स्थानिकांचा टायर जाळत रस्त्यावर ठिय्या..
आज गुरुवार सकाळ पासून राहुरी शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद..
दोन दिवसात आरोपीला अटक करण्याची मागणी अन्यथा जिल्हाभर उभारणार आंदोलन.. हिंदूत्वादी संघटनेचा इशारा..
राहुरी शहरातील बुवाशिंद बाबा तालमीमध्ये असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. त्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. मोठ्या संख्येने जमाव एकत्र आल्यानंतर आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने नगर-मनमाड रस्त्यावर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र कालपासून राहुरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतोय.. आज ही दिवसभर आठवडे बाजार, बाजारसमितीचा मोंढा आणि शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय..
राहुरी शहरातील बुवासिंध बाबा स्थानाच्या लगत असलेल्या बुवासिंध बाबा तालमीमधील महापुरुषाच्या पुतळ्याची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आली.. संबंधित प्रकार काल दुपारच्या सुमारास लक्षात आली. त्यानंतर शहरात तनाव निर्माण झाला..
विटंबना झाल्याचे दिसताच तरुणांनी एकत्र येऊन संताप व्यक्त केला. शेकडोंचा समुदाय नगर-मनमाड रस्त्यावर एकत्र आल्यानंतर चक्का जाम केला.. जमावाने शहरातून निषेध मोर्चा काढताच व्यापार्यांनी दुकाने बंद करून घेतली. जमावाने नगर-मनमाड रस्त्यावर पुतळा विटंबना करणार्यांचा निषेध करत रस्त्यावर टायर जाळत निषेध व्यक्त केला..
पोलिस पथकाने वेळीच धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले. जमावाचा संताप वाढत असतानाच नगर-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले, सभापती अरुण तनपुरे, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांसह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी धाव घेत जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले.
पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथकाने हजेरी दिल्यानंतर शहरात सर्वत्र बंदोबस्तासाठी पोलिस पथक तैनात करण्यात आले होते.जमाव सायंकाळी उशिरा फिर्याद दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला. घटनेबाबत आ. शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. दोन दिवसांत आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
व्यापार्यांनी गुरुवारी राहुरी शहरासह तालुका बंदचे आवाहन केल्यानंतर आज आठवडे बाजार आणि बाजार समितीमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार असल्याने व्यापारी, शेतकर्यांनी दखल घेण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
आज दिवसभर पोलीसांनी राहुरी शहरा सह ग्रामीण भागात गस्त सुरु ठेवलीये.. महत्वाच म्हणजे कडकडीत बंद पाळण्यात आला असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्पुर्तीनं बंद पाळल्याच दिसून आल.
#sp24taas #chhatrapatishivajimaharaj #rahuri #shivajimaharaj #ahilyanagarnews #ahilyanagarupdate #police
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: