#महाराष्ट्र
Автор: Maharashtra Kesari News
Загружено: 2020-12-22
Просмотров: 398
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण दबनार काय ? राजकारनाच्या नादात.
खुद्द आरोपींनी घेतली पत्रकार परिषद, तक्रार कर्त्यावरच कार्यवाई ची मागणी.
ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सौन्दड ग्राम पंचायतीचीच ?
सडक/अर्जुनी, ता. 22 - तब्बल 2 दिवसाचा कालावधी लोटला असुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणारे आरोपी आजही मोकाटच फिरत आहेत, त्या मुळे यात राजकारण केले जात असल्याचे आता समोर आले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण आता राजकारणाच्या पायदळी तुडवला जात असल्याचे नागरिकांत चर्चे दरम्यान समोर येत आहे.
दिनांक - 20 डिसेंम्बर 2020 रोजी सौन्दड ग्राम पंचायत च्या जुन्या इमारतीच्या मलब्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काही नागरिकांना मूत्र विसर्जन करीत असता दिसून आली, गुप्त नाव ठेवावे असे सांगून आमच्याशी संपर्क केला व आम्ही त्याची पाहणी करून नागरिकांना माहिती मिळावी या उद्देश्याने त्या बाबद चे वृत्त देखील प्रसारित केले,, तर काही नागरिकांनी सदर माहिती पोलिसांना देत लेखी स्वरूपाचे निवेदन दिले असुन दोषींवर कायदेशीर कार्यवाई करण्याची मागणी देखील केली आहे,
मात्र दोषी विरोधात अद्याप कोणतीही कार्यवाई करण्यात आली नसून उलट दोषी आरोपींनी पत्रकार परिषद घेऊन प्रेस नोट जारी केले आहे, त्यात तक्रार कर्त्यावर आणि वृत्त प्रकाशित करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे, विशेष सांगायचं म्हणजे पत्रात नमूद आहे की ग्राम पंचायत सौन्दड अंतर्गत अशी कोणतीही शिवाजी महाराजांची मूर्ती कार्यालया मध्ये उपलब्द्ध नव्हती.
मात्र 1990 ते 1995 या कालावधीत देवरी पंचायत समिती अस्तान्हा सर्व ग्राम पंचायत व सहकार कार्यालयात या मुर्त्या वाटप करण्यात आल्याची माहिती काही जाणकार चर्चे दरम्यान सांगत आहेत, परिसरातील अनेक ग्राम पंचायत मध्ये या प्रकारच्या मुर्त्या आजही उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे, तर सौन्दड गावात राहणारे अनेक आजी माजी ग्राम पंचायत सदश्य व नागरिकांचे म्हणणे आहे की सदर मूर्ती ही जुन्या जीर्ण झालेल्या इमारती मध्ये होती,
आता पत्रकार परिषदेत सांगितलेली माहिती ही खोटी असल्याचे यावरून सिद्द होत आहे, जुन्या जीर्ण इमारती च्या लाकडी पेटीवर ही मूर्ती ठेवली असायची मात्र ग्राम पंचायत चे पदाधिकारी यांनी शुद्ध नकार देत उलट तक्रार दारांना गुंडाळण्याचा डाव रचला आहे, महाराष्टाचे कुलदैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता हेतू परष्पर फेकून अपमानित केल्याचे समोर येत आहे, ग्राम पंचायत कार्यालया मध्ये जुने साहित्य टाकून देण्या साठी एक रूम आहे, त्या रुमच्या अगदी बाजूला मुत्र वीसर्जन करण्यासठी नागरिक जातात,
त्यातील काही नागरिकांना हि मूर्ती दिशून आली आणि त्यांनी माहिती दिली, ग्राम पंचायत कार्यालयाचे पधाधिकारी व सदर कंत्राटदार यांनी मूर्तीची प्रती स्थापना न करता हेतू परस्पर दुर्लक्षित केले आहे, त्या मुळे दोषीवर कायदेशीर कार्यवाई व्हावी हि मागणी नागरिकातून होत आहे, ग्राम पंचायत कार्यालयात मूर्ती होती तर ती गेली कुठे हा सवाल सुद्धा या निम्मित्ताने उपस्थित होत आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने भिक मागून सत्तेत आलेले लोक प्रतिनिधी या प्रकरणाकडे डोकावून सुद्धा पाहत नाही हा सुद्धा ग्राम वासियांसाठी चर्चेचा विषय आहे,
काही दिवसा पूर्वी महाराष्ट्र राज्याचे विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित सडक/अर्जुनी येथे याच ग्राम पंचायत अंतर्गत तब्बल १५३ लोकांनी कॉंग्रेश पक्षात प्रवेश केला होता, आता या कार्यकर्त्यांवर कोण कार्यवाई करणार हा सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे, या वृता बाबद उप्पर पोलिश अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना विचारणा केली असता तपास चालू अश्ल्याची माहिती दिली आहे, आता हा तपास किती दिवस, किती महिने, वा किती वर्ष चालणार ते साहेबांनाच ठाऊक
मात्र एखानद्या निर्दोष माणसावर कार्यवाई करायला वेळ लागत नाही हा देखील महत्वाचा विषय नागरिकांच्या चर्चेत आहे. एकंदरीत दोषीवर कार्यवाई ची मागणी होत आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: