कोकणचे खेळे ( झांजगी नमन ) असोरे
Автор: Jayesh Badavate
Загружено: 2022-05-27
Просмотров: 4912
कोकण आणि नमन (खेळे) यांचं एक अतूट असे नाते आहे. नमन ही कोकणची एक लोककला आहे. त्यामुळे नमन म्हटले की कोकणी माणूस ते बघायला कुठेही आणि कितीही वेळा परिवारासह आवर्जून जातो. ही लोककला कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात जोपासली जाते. यात पुरातन तर काही कथित पात्रांची वेशभूषा करून लोकांसमोर सादरीकरण केले जाते.
यात खेळे पुरातन गोष्टींशी निगडित गायनातून कथा सांगतात. मृदुंग आणि टाळाच्या ठेक्यात त्या गाण्यांना वेगळाच सुर मिळतो. सोबत संकासुर, थेर आणि कोळीण नाचत असतात.
गणपती ची आरती केली जाते. आकर्षक सजावट करून गणपतीचा मुकुट घातलेला माणूस उभा करून त्याची आरती केली जाते. त्यानंतर येतात नटवा. नटवा हे पात्र हजरजबाबी व्यक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून असते. गणपती नंतर त्यांचा मान असतो. या नमानात घोडा, नंदीबैल यासारखी लाकडी मुखवटा असलेली पात्र सुद्धा दाखवली जातात. सोबत कृष्ण अवतार म्हणजेच गवळण दाखवली जाते. बऱ्याचदा पुरुष स्त्री पात्र म्हणजेच गवळणीचे पात्र साकारतात. गवळणी कृष्णाची सुरेल अशी सुमधुर गाणी रचली जातात आणि चाली लावून सादरीकरण होते.
गुरुबावाजी चे पात्र एका आदिवासी चे पात्र असते. ज्यात पूर्ण अंगभर झाडाची पाने लपेटून नाच केला जातो. तसेच दहा तोंडी रावणाचा वध हे विशेष जिव्हाळ्याच सादरीकरण पाहण्यासाठी लोकं येत असतात.. लाकडी दहा तोंडाचा मुखवटा घालून हे रामायण दाखवले जाते यात रावणाचा वध केला असे दाखवले जाते. त्याचप्रमाणे अस्वल, वाघ, पारधी यासारखी सादरीकरण कोकणच्या नमनात विशेषतः पाहायला मिळतात. सरते शेवटी आरती घेऊन नवस बोलले जातात आणि बोललेले नवस फेडले जातात. त्यानंतर नमन समाप्त होते.
कोकणातील लोकांच्या करमणुकीचे हे साधन आर्थिकदृष्टया सुद्धा उपयोगात येते. कोणाच्या घरी लग्न, बारसे, पूजा असेल तर आवर्जून पैसे देऊन नमन ठेवले जाते.
अशा प्रकारे कोकणातील माणसांच्या मनात नमनाला एक उच्च स्थान आहे.
आयुष्यात एकदा कोकणचे खेळे बघाच...!
part 1 • कोकणचे खेळे नमन असोरे, गुहागर , गवळण भाग-१...
part 2 • कोकणचे खेळे नमन असोरे, गुहागर , गवळण भाग-२...
( Thanks to niklesh gondhali & mandar badavate )
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: