देवराई | Sacred Grove | एक महत्वाची परिपूर्ण परिसंस्था
Автор: Rupak Sane
Загружено: 2025-02-18
Просмотров: 4419
निसर्ग अंगणापासून डोंगरपर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत.
समाजाने धार्मिक महत्त्व देऊन राखून ठेवलेल्या जंगलाच्या एका लहान तुकड्याला देवराई म्हणतात. इंग्रजीत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह किंवा ‘चर्च फॉरेस्ट’ असेही म्हणलं जातं. वृक्षवाढीसाठी मनुष्याने व्यक्त केलेली ही एक कृतज्ञतेची भावना आहे.
अश्या देवराईत एक देवस्थान असतंच आणि ती त्या देवाच्या नावाने राई म्हणून प्रसिध्द असते .
तिथल्या वन-राज्यावर देखरेख करणारी एक सामर्थ्यशाली देवता या देवराईत असते असा तिथल्या स्थानिक लोकांचा विश्वास असतो. ही देवता बर्या्चदा तांदळा म्हणजे निराकार पाषाणाची असते.
शिरकाई, वरदाई, येसूबाई, राणूबाई,अश्या नावाने या मातृदेवता असतात.
काही पुरुष देवताही चेलोबा, म्हसोबा, खेतोबा भैरोबा अश्या नावाने असतात. ह्या देवराया म्हणजे गावाची धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असते. गावदेवाचे उत्सव सार्वजनिकरित्या देवराईमध्ये साजरे केले जातात.
अशा परिसरात परंपरेने अनेक प्रतिबंध घातलेले असतात.
पूर्वी देवराईचे नियम समाजाने समाजाला घालून दिलेले असतं कोणीही देवराईतील झाडाची फांदीही तोडत नसे, सुकलेल्या झाडाची काटकीही घरी घेऊन जात नसत. झाडावरचे किंवा झाडावरून खाली पडलेले फूलही देवाला वाहत नसत. असे संकेत पाळले जात होते.
बऱ्याचदा या देवराया जलाशयाजवळ असतात.
अशी अरण्ये सरकारने सांभाळलेली नसून समाजाने परंपरेने आणि देवाच्या भीतीने सांभाळलेली असतात.
सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी भटके जीवन सोडून मानव शेती करू लागला; शेतीसाठी साहजिकच जंगलतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. पण वस्ती व गावाजवळील जंगलाचा काही भाग जाणीवपूर्वक राखून ठेवायाचा आणि जंगलचे संवर्धन करायचे ह्या जाणीवेने आणि देवावरच्या श्रद्धेने, या जंगल क्षेत्रांना संपूर्ण संरक्षण दिले गेले. यातून शेकडो वर्षे हे जंगलांचे तुकडे संरक्षित राहिल्याने निसर्ग संतुलन साधले गेले.
देवराई म्हणजे नुसते देवाचे ठिकाण किंवा जंगल नवते, तर गावाची समृद्धी, संस्कार, परंपरा, व एकोपा याच देवरायांनी जपलेला आहे. देवराईतील झाडामुळे जमिनीवर आच्छादन होऊन जमिनीची धूप थांबून पाणी धारण करण्याची क्षमता चांगली राहते.
देवराया या जैविक विविधतेच्या दृष्टीने समृद्ध असतात.
शिकारी व वृक्षतोडीला बंदी असल्याने अधिवास सुरक्षित राहतो.
प्राणी आणि वनस्पती यांच्या वाढीसाठी अनुकूल पर्यावरण असल्याने त्यांची जनुकीय विविधता राखली जाते.
भारतात सु. एक लाख तर महाराष्ट्रात सु. २,५०० देवराया आहेत.
महाराष्ट्रातील कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्यांच्या उगम परिसरातील महाबळेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर येथील देवराया वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
या देवराईतील मुख्य देवतेच्या मूर्तीच्या आसपास अनेकदा वीरगळ म्हणजे हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कोरलेल्या शिळा असतात. वीरगळावरील मानवी आकृत्या ओबडधोबड असतात. .
एनेक ठिकाणी प्राचीन मंदिरांचे अवशेषही दिसतात.
महाराष्ट्रातल्या बर्यादच देवराया सह्याद्रीच्या मुख्य रांगेत,कोकणपट्ट्यात ,मावळ भागात आणि घाट माथ्यावर आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (१९९९) अहवालानुसार महाराष्ट्रात सु. ३६०० च्या वर देवराया नोंदविल्या आहेत.
देवराईचा विस्तार हा एका झाडाच्या देवराईपासून ते शंभर एकरपर्यंत असू शकतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडोबा, मोचीमाडजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण देवराई आहे. येथे एकच झाड आहे आणि ते संरक्षित आहे.
दुसरीकडे याच भागातील डोंगोबा कोचऱ्याजवळची देवराई तब्बल १०० एकरांवर पसरली आहे.
सर्वसाधारण गावांच्या सीमेवर असलेली देवराई लहान असते.
देवराईचे महत्त्व तिच्या आकारमानापेक्षा त्यात आढळणाऱ्या प्रजातींवर अवलंबून असते.
ती एक (Climax Ecosystem) म्हणजे अति उच्च दर्जाची नैसर्गिक परिस्थिती असते.
ती एक जनुक पेढी (gene bank), बीज पेढी (seed bank) आणि जल पेढी ( water bank) सुद्धा असते. यात अनेकदा बारमाही उगम पावणारे झरे आणि जलप्रवाह असतात.
काही प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आता केवळ देवरायांतच आढळतात.
झाडा-झुडपांचे गचपण, पुरेसा आडोसा, गारवा, संरक्षण यामुळे देवराईमध्ये साप, सरडे, पाली, सापसुरळ्यानागांचे विविध प्रकार आढळून येतात.
भारतातील देवरायींचा अभ्यास करणारे डॉ. वा. वर्तक आणि डॉ. माधव गाडगीळ हे देवरायांचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी महाराष्ट्रातील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले.
कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात 'सह्याद्री संवर्धन केंद्र' यांच्यासरख्यांकडून कडून संवर्धन आणि संरक्षणाचे काही उपक्रम राबविले जातात हे काही आशेचे किरण आहेत.
एखादं देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणता येणार नाही.
देवराईची आणि गावाची नाळ जोडलेली असली पाहिजे,
वन विभागाने पाश्चात्य झाडे लावून वाढवलेल्या जंगलास देवराई म्हणता येणार नाही.
आता मात्र मानवी हस्तक्षेप, शहरांची बेसुमसार वाढ, नैसर्गिक संसाधनांची अनिर्बंध लूट, पर्यावरण गुणवत्तेत होत असलेली घट, आणि बेशरम प्रवृत्ती यांमुळे हा देवरायांचा आपल्याला मिळालेला समृद्ध वारसा शेवटच्या घटका मोजत आहे. त्याचें अस्तित्व संपत आहे.
ग्रामसंस्कृती संपून शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली आहे. देवाची भीती आता राहिलेली नाही.
काळाच्या ओघात शेवटच्या घटका मोजत असताना यां देवरायांना मोठमोठ्या परिषदेतून ‘हॉट स्पॉट्स‘ असं घोषित केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र देवरायांचे आकार आटत चाललेले आहेत.
पूर्वजांनी जपलेला हा धा्गा आपण सारेमिळून टिकवूया
तो धागा म्हणजेच आपलं आणि निसर्गाचं नातं. आणि तोच अंगणापासून डोंगरपर्यंतचा निसर्ग.
माझ्या चॅनलला subscribe, like, share करा.
मोबाईल - 9420444969
[email protected]
/ @rupaksane
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: