समरभूमी उंबरखिंड | उंबरखिंडीची लढाई | उंबरखिंड विजय स्तंभ व विजयोत्सव | Samarbhumi Umbarkhind
Автор: JoyBoy Traveller
Загружено: 2025-04-19
Просмотров: 875
समरभूमी उंबरखिंड | उंबरखिंडीची लढाई | उंबरखिंड विजय स्तंभ व विजयोत्सव | Samarbhumi Umbarkhind
रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यात, खोपोली-पाली रस्त्यावरील शेंबडी गावापासून ०४ कि.मी अंतरावर चावणी गावाच्या अलिकडे उंबरखिंड आहे.
उंबरखिंड युद्ध विजयस्तंभाची उंची १२.५० मीटर असून, स्तंभाच्या समोरील बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून, डावीकडे आज्ञापत्रातील वृक्षा विषयीची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ याच्या मोठ्या प्रतिकृती करून ठेवल्या आहेत.
२ फेब्रुवारी इ.स.१६६१ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरून उंबरखिंडीच्या दिशेस उतरु लागले. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला.
मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करून प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरून गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणाऱ्या मराठा सैन्याला घाबरून मुघल सैनिक मार्ग मिळेल तेथे पळत होते. पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरून कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला.
पाठीवर बाणांचे भाते , एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात भाला , कमरेला तलवार , मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात शिवाजी राजे घोड्यावर बसलेले होते.
कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने शिवाजी राजांना दिला. शिवाजी राजांनी विनंती मान्य करून , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले.
युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेतोजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुरच्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले.[
या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लोणावळा येथील 'शिवदुर्ग मित्र , लोणावळा ' ह्या संस्थेने २००१ साली उंबरखिंडीत अंबा नदीच्या पात्राशेजारी ध्वजस्तंभ उभारून हा विजयोत्सव सुरू केला. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो.
Music Track by:-Infraction - No Copyright Music
Epic No Copyright Music: https://open.spotify.com/playlist/6rP...
Emotional No Copyright Music: https://open.spotify.com/playlist/14u...
Cinematic No Copyright Music: https://open.spotify.com/playlist/4IF...
Camera: - Sj6 Legend
Instagram Link: - https://instagram.com/parab.ravindra?...
Facebook Link: -https://www.facebook.com/ravindra.par...
_______________________________________
ABOUT JOYBOY TRAVELLER
I am Ravindra (Malvani Manus). I am the owner of the JOYBOY TRAVELLER Channel.
My dream is to travel the world and make videos about it.
I would love for you to subscribe and travel with me!
Thank you for taking the time to watch.
Share and subscribe if you like it.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: