नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल | लोहगाव बॉर्डर ते कटकेवाडीपर्यंतचा आर. पी. रस्ता
Автор: Dnyaneshwar (Mauli Aaba) Katke
Загружено: 2026-01-11
Просмотров: 143
पूर्व पुणे – नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल…
पुणे शहराच्या पूर्व भागातील वेगाने विस्तारत असलेल्या वाघोली परिसरात वाढती लोकसंख्या, निवासी व व्यावसायिक प्रकल्पांमुळे वाहतुकीचा ताण सातत्याने वाढत आहे. ही गरज ओळखून मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून आणि मा. आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांच्या प्रयत्नांतून पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेला रस्ता क्र. २ – लोहगाव बॉर्डर ते कटकेवाडीपर्यंतचा ३० मीटर रुंद व ५.१३१ किमी लांबीचा आर. पी. रस्ता अत्याधुनिक काँक्रीटीकरणासह विकसित करण्यात येणार आहे. सुमारे ₹२०४.३६ कोटी खर्चाच्या या प्रकल्पात शास्त्रीय रचना, पदपथ, पार्किंग, सेवा वाहिन्या, आधुनिक ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि सुरक्षित प्रकाश व्यवस्था यांचा समावेश असून हा रस्ता प्रस्तावित अंतर्गत रिंग रोडला जोडणारी महत्त्वाची कडी ठरणार आहे. यामुळे दररोज ४० ते ५० हजार पीसीयू वाहतूक पर्यायी मार्गाने वळवता येऊन पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सुव्यवस्थित पायाभूत सुविधा, वेळ व इंधनाची बचत आणि शाश्वत उपनगरीय विकासाचा मजबूत पाया हा प्रकल्प निश्चितच घडवून आणणार आहे. ही विकासाची गती अशीच सुरू ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.!
#PMCElections2026 #PCMCElections2026
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: