अहिल्यानगरमध्ये 'बिंगो' जुगाराचे थैमान; कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी
Автор: MJ News 90
Загружено: 2025-12-05
Просмотров: 381
ग्लोबल मानव पब्लिक सेवा समिती तर्फे
अहिल्यानगरमध्ये 'बिंगो' जुगाराचे थैमान; कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी
अहिल्यानगर शहरात सध्या अवैध्य धंद्यांनी उच्चांक गाठला असून, त्यात 'बिंगो' नावाच्या जुगाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत निवेदन देऊन हा जुगार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हा जुगार दिवसाढवळ्या खुलेआम शहरातील विविध ठिकाणी टपऱ्यांमध्ये चालू आहे. विशेषतः जिल्हा पोलीस अधीक्षक निवासस्थान, महानगरपालिका आणि वन विभाग यांसारख्या शासकीय कार्यालयांच्या परिसरात तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
या जुगारातून होणाऱ्या मोठ्या उलाढालीमुळे शहरात अनेक वेळा गँगवार झालेली आहे.
जुगार खेळनारे कर्जबाजारी झालेल्या लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
या जुगाराचे व्यसन शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्येही वाढत आहे. ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष
शेख फारूक गुलाब व पटेल सर व फारूक फरशी हामिद शेख मोशिनशकिल अरबाज शेख फैयाज तांबोळी रिजवान सय्यद यांनी हे निवेदन दिले आहे. MJ News90 अहिल्यानगर#mjnews90 #news #come #people #crime #police #ahmednagar #महाराष्ट्र #अहमदनगर #छत्रपतीशिवाजीमहाराज #अहिल्यानगर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: