तेल न वापरता जास्त दिवस टिकणारे झटपट लिंबाचे आंबट गोड लोणचे 😋😋😍😍
Автор: Varsha Desai
Загружено: 2026-01-09
Просмотров: 135
साहित्य: 10 ते 12 लिंबू, 2चमचा मीठ ,१ चमचा हळद,
अर्धा चमचा हिंग ,
१.एक चमचा काश्मिरी मिर्च
२.तीन चमचे लाल तिखट
३.अर्धी वाटी साखर
४. एक वाटी मोहरीची डाळ
कृती:१ लिंबू पाण्यामध्ये तीन दिवस चिमूटभर मीठ टाकून भिजत ठेवायचे आणि रोज पाणी बदलत राहायचे जेणेकरून लिंबू लवकर मुरण्यास मदत होईल.
२नंतर लिंबू स्वच्छ पाण्याने धुऊन कपड्याने पुसून कोरडे करून घ्यायचे.
३ लिंबाच्या फोडी करून त्याच्यातल्या सर्व बिया काढून टाकायच्या .
४एका पातेल्यात दोन चमचे मीठ ,एक चमचा हळद, अर्धा चमचा हिंग मंद आचेवर भाजून घ्यायचे जेणेकरून आपले लोणचे जास्त दिवस टिकण्यास मदत होईल.
५मग त्याच गरम पातेल्यात थोडसं हिंग टाकून काचेच्या कोरड्या बरणीला धुरी द्यायची यामुळे आपले लोणचे खराब होणार नाही व जास्त दिवस टिकून राहील.
६ सर्व लिंबाच्या फोडी पातेल्यात घेऊन त्यामध्ये मीठ हळद हिंग मिक्स करून मिश्रण सर्व एकजीव करायचे.
७ हे मिश्रण काचेच्या कोरड्या झालेल्या बरणीत भरून घट्ट झाकण लावून तीन ते चार दिवस मुरत ठेवायचे.
८रोज बरणी खोलून हे मिश्रण खाली वर करत राहायचे .तीन ते चार दिवसांनी लिंबाच्या फोडी मुरतात हे हाताने दाबून बघायच्या.
९ नंतर त्यामध्ये एक चमचा काश्मिरी मिर्च, तीन चमचे लाल तिखट ,अर्धा वाटी जाड साखर मिक्सरला बारीक करून व एक वाटी मोहरीची डाळ जाडसर मिक्सरला बारीक करून सर्व मिश्रण लिंबाच्या फोडींना लावून मिक्स करून घ्यायचे व बरणी घट्ट बंद करून घ्यायची.
१० लिंबाचे झटपट आंबट गोड लोणचे खाण्यास तयार आहे
टिप :-मी इथे पोहे खातो तो चमचा वापरला आहे
पाण्याचा जराही हात लागू द्यायचा नाही
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: