कुणकेरीचा हुडोत्सव | गायिका कु. समृद्धी सावंत | संगीत श्री. निलेश मेस्त्री | गीत सौ. निता सावंत
Автор: Niraj Bhosale official
Загружено: 2023-03-11
Просмотров: 14079
सावंतवाडी शहरापासून ६ कि.मी वर निसर्गाच्या कुशीत वसलेलं, रुढी परंपरा जपणारं
"कुणकेरी" हे छोटंस गाव. वैभवसंपन्न या गावात प्रवेश केल्यावर नजर खिळवून
ठेवणारं नवसाला पावणाऱ्या श्री देवी भावईचं प्रशस्त मंदिर. दिवसेंदिवस जग अपडेट होताना आजही कोकणातील रुढी, परंपरा, संस्कृती या गावानं जपलीय. असाच एक नेत्रदीपक उत्सव म्हणजे "कुणकेरीचा हुडोत्सव..." या चित्तथरारक, अंगावर शहारे आणणाऱ्या उत्सवाचं वर्णन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या गीतामधून करत आहोत..🙏🏻😊
• गायिका :- कु. समृद्धी तानाजी सावंत-भोसले
• गीत :- सौ. निता नितिन सावंत-भोसले
• संगीत/संगीत संयोजन :- श्री निलेश रघुनाथ मेस्त्री. (श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी)
• रेकॉर्डिंग :- कु. मंगेश मेस्त्री, कु पुरुषोत्तम (समर्थ) केळुसकर
• प्रोग्रामिंग, मिक्सिंग, मास्टरींग :- कु. मंगेश रामचंद्र मेस्त्री
• तबला :- श्री किशोर सावंत-भोसले
• ढोलकी/दिमडी :- कु. संकेत म्हापणकर / कु. प्रज्योत खडपकर
• हार्मोनियम :- श्री निलेश मेस्त्री
• साईड रिदम :- कु. केतकी सावंत-भोसले
• कोरस :- कु केतकी सावंत, ॲड. सिद्धी परब, श्री सर्वेश राऊळ, श्री नितिन धामापूरकर
• चित्रीकरण :- श्री ओमकार सावंत व श्री सर्वेश राऊळ
• संकलन :- कु निरज मिलिंद भोसले
• छायाचित्रण :- श्री सर्वेश राऊळ [SR Photography & Films]
• ड्रोन शूट - श्री साईनाथ मठकर [SM production India]
• बॅनर डिझाईनिंग :- श्री गोविंद मळगावकर [ श्री स्वामी समर्थ आर्ट्स]
• विशेष सहाय्य :- श्री नितिन सावंत-भोसले, श्री प्रसन्न प्रभूतेंडुलकर, श्री रामदास गवस, कु. पुरुषोत्तम (समर्थ) केळुसकर, कु मनीष पवार, श्री महेंद्र मांजरेकर, कु यत्वेश राऊळ, कु केतकी सावंत.
• विशेष आभार :- श्री सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी,श्री देवी भावई पंचायतन आणि देवस्थान कमिटी, कुणकेरी, श्री ओमकार सावंत (Omkar V Sawant Photography), श्री सोमेश्वर सावंत, श्री विनायक गांवस [ कोकणसाद लाईव्ह न्यूज चॅनल]न
⛳या गीता मध्ये वर्णन केलेल्या कुणकेरीच्या पारंपरिक हुडोत्सवाबद्दल थोडक्यात माहिती :-
कुणकेरी गावच्या या शिमगोत्सवाची हुडोत्सवाची सुरुवात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी 'हरतीर' या कार्यक्रमापासून केली जाते.
🏵️ हुडा :- कुणकेरीचा हा हुडा सागवानी लाकडाचा असून फेब्रुवारी २०१२ मध्ये या हुड्याचे नूतनीकरण करण्यात आले. उत्सवावेळी या संपूर्ण हुड्यावर आंब्याचे टाळ बांधले जातात. तसेच तीन अवसार या हुड्यावर उत्सवावेळी अगदी लीलया चढतात. या वेळी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अफाट गर्दीतून या अवसरांवर दगड मारण्याची प्रथा आहे.
🏵️ होळी :- कुणकेरी गावी फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री भेडला माडाची होळी घातली जाते. ढोल ताशांच्या गजरात ही होळी हुड्याच्या अगदी शेजारीच उभारली जाते. तसेच श्री देव लिंग मंदिराकडे आंब्याची होळी घातली जाते.
🏵️ खेळगडी :- डफ व घुमट या पारंपरिक वाद्यांच्या वापर करून गावात खेळ केले जातात. हे खेळगडी जी गाणी म्हणतात त्यांना "जती" असे म्हणतात. हा एक पारंपरिक असा मौखिक कलाप्रकार आहे. घोडेमोडणी, वाघाची शिकार - कुणकेरीच्या हुडोत्सवाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे वाघाची शिकार. रोंबटात वाघाची लुटुपुटुची शिकार केली जाते तसेच घोडेमोडणीही केली जाते.
कोलगाव - कुणकेरी - आंबेगावचे नाते - होळीच्या सातव्या दिवशी श्री भावई मातेचा मोठा बंधू आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल तसेच लहान बंधू कोलगावचा श्री देव कलेश्वर आपल्या बहिणीच्या म्हणजेच श्री देवी भावई देवीच्या हुडोत्सवात तरंग - काठीसह, अवसार व मानकर्यांसह सहभागी होतात. केवळ धार्मिक अंगाने नव्हे तर कोलगाव, कुणकेरी व आंबेगावच्या एकीचे व सलोख्याचे दर्शन घडविणारा उत्सव आहे.
🏵️ शेणी मारणे :- होळीच्या सहाव्या दिवशी रात्री हुड्यावर व होळीवर पेटत्या शेणी (शेणाच्या गोवर्या) मारल्या जातात. दिवाळी सणाला पाडव्याच्या शेणाचा गोठा करतात व दुसऱ्या दिवशी या शेणाच्या गोवर्या (शेणी) घालतात. याच शेणी होळीवर व हुड्यावर मरण्यासाठी नेल्या जातात. 'हव्वा हव्वा' च्या जल्लोषात हुड्याभोवती फेर धरला जातो. या नंतर कवळं (झाडाच्या सुकलेल्या फांद्या) पेटवल्या जातात व त्याभोवती फेर धरतात.
🏵️ श्री देवी भावईचे देवघर :- कुणकेरी (परबवाडी) येथे श्री देवी भावईच्या देवघरी श्री देवी भावई उत्सवमूर्ती आहे. हुडोत्सवाच्या दिवशी नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे इ. कार्यक्रम होतात. नवसाला पावणाऱ्या श्री देवी भावई मातेची सर्वदूर कीर्ती पसरलेली आहे. श्री देवी भवानी देवीची भेट - होळीच्या पाचव्या सहाव्या व सातव्या दिवशी मानकरी, रोंबाटासह निशाणीकाठीसह वाजतगाजत सावंत - भोसले कुलस्वामिनी श्री देवी भवानी देवीच्या भेटीला भवानीवाडी येथे येतात. तसेच भवानीवाडी येथे होळीच्या सहाव्या रात्री कवळं पेटवली जातात.
🏵️ हुडोत्सवाची सांगता :- होळीच्या आठव्या दिवशी भांडार्याचा कार्यक्रम होऊन घटस्थापनेने सुरू झालेल्या या उत्सवाची घाटाच्या विसर्जनाने सांगता होते
सौ निता नितिन सावंत
©Niraj Bhosale official
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: