कार्बनी संयुगेCarbon compounds|Fast revision with MCQ &Notes|Class 10th|Competitive ex|MPSC|TET|Bank
Автор: Shashank Kulkarni
Загружено: 2023-02-19
Просмотров: 3047
#chemistrynotes #sciencemcq
कार्बनी संयुगे(Fast revision with MCQ.):-कार्बन अणू इलेक्ट्रॉन संरूपण 2,4 .संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 4. कार्बनच्या संयुजा कवचात 4 इलेक्ट्रॉन निऑनचे संरूपण गाठण्यासाठी कार्बनचे दोन अणू एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉनांचे संदान करतात . दोन्ही अणूंच्या संयुजा कवचामध्ये परस्परव्यापन होऊन त्यात कवचांचे संदान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात . त्यामुळे प्रत्येक कार्बनचा अणू राजवायू संरूपण गाठतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युतप्रभार निर्माण होत नाही , म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन राहतात व स्थायित्व प्राप्त करतात . त्यामुळे राजवायू संरूपण गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग घेतो . दोन अणूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संदानाने किंवा भगीदारीने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध म्हणतात .कार्बनची वैशिष्ट्ये : ( 1 ) कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता असते ; त्यातून मोठे रेणू तयार होतात . कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखलाबंधन शक्ती ( Catenation power ) म्हणतात . ( 2 ) दोन कार्बन अणूंमध्ये एकेरी सहसंयुज बंध , दुहेरी सहसंयुज बंध व तिहेरी सहसंयुज बंध तयार होऊ शकतात . उदा . , कार्बनच्या दोन अणूंच्या वापरातून ईथेन ( CH3 - CH3 ) , एथीन ( CH2 = CH2 ) व ईथाइन ( CH = CH ) अशी तीन संयुगे तयार होतात . ( 3 कार्बन चतु : संयुजी असतो . जेव्हा एक कार्बन अणू चार कार्बन किंवा इतर अणूंशी बंध तयार करू शकतो तेव्हा अनेक संयुगे निर्माण होतात . कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त झालेले दिसतात . उदा . , हायड्रोजन व क्लोरीन या दोन एकसंयुजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने पाच वेगवेगळी संयुगे तयार होतात . CH4 , CH3Cl , CH2C12 , CHCl3 , CCl4 . अशाच प्रकारे कार्बन अणूंचे O , N , S , halogen , P इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूंबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात . 4 ) कार्बनी संयुगांच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य कार्बनमध्ये आहे , ते म्हणजे ' समघटकता '.
1. संपृक्त हायड्रोकार्बन ( Saturated Hydrocarbon ) : ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे , अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात . संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन असेही म्हणतात . उदा . , मीथेन ( CH4 ) , ईथेन ( C2H6 ) , प्रोपेन ( C3H8) 2. असंपृक्त हायड्रोकार्बन ( Unsaturated Hydrocarbon ) : ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन - कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो , त्यास असंपृक्त हायड्रोकार्बन असे म्हणतात . अंसपृक्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन - कार्बन असा दुहेरी बंध ( C = C ) असतो , त्याला अल्कीन म्हणतात . उदा . , एथीन ( CH2 = CH2 ) , प्रोपen ( CH3 - CH = CH2 ) . = असंपृक्त हायड्रोकार्बनमधील कार्बन - कार्बन असा तिहेरी बंध असतो , त्याला अल्काइन म्हणतात . उदा . , ( C2H2) ईथाइन.
**क्रियात्मक गट ( Functional group ) : विषम अणूंमुळे किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमळे त्या कार्बनी संयुगाला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात . म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात .उदा, मिथ्यएल अल्कोहोल मध्ये OH हा क्रियात्मक गट आहे.
**समजातीय श्रेणी ( Homologous series ) : कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलाची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साधर्म्य असते . तसेच लगतच्या दोन संयुगांमध्ये ( वरचा व खालचा ) एका - CH2 , - गटाचा फरक असतो , अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात . समजातीय श्रेणीची वैशिष्ट्ये : ( 1 ) समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना ( अ ) एका मेथिलिन ( CH2 ) घटकाची भर पडते . ( आ ) रेणुवस्तुमान 14u ने वाढते . ( इ ) कार्बन अणूंची संख्या 1 ने वाढते . ( 2 ) समजातीय श्रेणीतील संयुगांत समान क्रियात्मक गट असल्याने रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य असते . ( 3 ) समजातीय श्रेणीच्या सर्व संयुगांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र असते . न ( 4 ) समजातीय श्रेणीत चढत्या क्रमाने जाताना संयुगांच्या उत्कलनांक , द्रवणांक यांसारख्या भौतिक गुणधर्मांमध्ये प्रवणता दिसून येते .
1)प्रतियोजन अभिक्रिया ( Substitution Reaction ) : अभिक्रियेमध्ये जेव्हा रेणूमधील एका प्रकारच्या अणूची / अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू / अणुगट घेतो तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया म्हणतात .
2)Addition reaction (समावेशन अभिक्रिया) is a reaction in which molecule, atom or groups are added on multiple bonded carbon atom to form only one product is called addition reaction.
ईथेनॉल : ईथेनॉल कक्ष तापमानाला रंगहीन स्वरूपात असून त्याचा उत्कलनांक 78 ° C आहे . सामान्यतः ईथेनॉलला अल्कोहोल किंवा स्पिरीट व मराठीत मदयाकं म्हणतात . ईथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणात विद्राव्य असते . ईथेनॉलची लिटमसने परीक्षा केली असता ते उदासीन आढळते . ईथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे . त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन ( आयोडीनचे अल्कोहोलमधील द्रावण ) , खोकल्याचे मिश्रण अशी औषधे तसेच अनेक बलवर्धकांमध्ये करतात . . ईथेनॉलची सोडिअम घातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू व सोडिअम ईथॉक्साइड ही उत्पादिते तयार होतात .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: