शिमग्यासाठी चाललो गावाला ❤️😊 | पनवेल ते कोकणातलं गाव रात्रीचा प्रवास - Panvel to Konkan Traveling
Автор: S FOR SATISH
Загружено: 2021-03-28
Просмотров: 191410
शिमग्यासाठी चाललो गावाला ❤️😊 | पनवेल ते कोकणातलं गाव रात्रीचा प्रवास - Panvel to Konkan Traveling शिमगा म्हटला की चाकरमानी गावी जाणारच. कोकणात शिमगा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई शहरातील चाकरमानी खास गावी शिमग्याला जात असतो. आम्ही सुद्धा दरवर्षी न चुकता खास शिमग्याला गावी कोकणात जातो. यावेळेस आम्ही गावी शिमग्याला निघालो तेव्हा शॉपिंग सुरू केली. शॉपिंग करायला दोन तीन दिवस पुरत नाहित. आम्हाला रातराणी गाडीने गावी जायचे होते. आमच्या गावात प्रायव्हेट गाड्या सणासुदीला मुंबईवरून सुटतात. आम्ही पनवेल येथे बसलो. रात्रीचा प्रवास आणि सोबत प्रांजु प्रदनु दोघे सुद्धा होते. गावी जायची एक वेगळीच ओढ प्रत्येक वेळेस असते. पनवेलला साडेबारा वाजता गाडी आली आणि आमचा प्रवास सुरु झाला. आम्ही शालिमार ढाब्यावर थांबलो नाश्ता चहापाणी केला आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. #MumbaitoKonkanTraveling #KonkanShimga #PanvelToKonkanVillageTraveling #sforsatish
आमची गाडी महाडमार्गे मंडणगड वरून गेली. आता मुंबई गोवा हायवे खूप छान बनत आहे. रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. आम्ही गावी सकाळी पोहोचलो. आई खास प्रदनु प्रांजु आले घरी म्हणून खुश होती. आम्ही आता काही दिवस गावी कोकणात राहू. तुम्हाला गावचे कोणते व्हिडीओ बघायला आवडतील ते आम्हाला जरूर कळवा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा शिमग्यासाठी मुंबई ते कोकणातील गाव असा रात्रीचा प्रवास दाखवला आहे. हा प्रवासाचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: